राहुरी/वेबटीम:- विविध प्रकारचे गुन्हे करणारे राहुरी तालुक्यातील 4 आरोपी 18 महिन्यासाठी अहमदनगर जिल्हयांतुन हददपार केले आहेत. तसेच वारंटामध...
राहुरी/वेबटीम:-
विविध प्रकारचे गुन्हे करणारे राहुरी तालुक्यातील 4 आरोपी 18 महिन्यासाठी अहमदनगर जिल्हयांतुन हददपार केले आहेत. तसेच वारंटामधील 4 आरोपी अटक केले आहेत. राहुरी पोलीस ठाण्याने ही कारवाई केली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक सो. बी.जी.शेखर पाटील, पोलीस अधिक्षक राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधीकारी संदिप मिटके यांनी दिलेल्या सूचने प्रमाणे पोलीस स्टेशनचे हददीमध्ये वारंवार गुन्हे करणारे आरोपी व गुन्हेगार यांचेवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
सदर आदेशा प्रमाणे राहुरी पोलीस स्टेशन हददीतील आरोपी नामे टोळीप्रमुख भारत भाऊसाहेब ढोकणे (वय 28 वर्षे रा. बालाजी मंदिर राहुरी ता. जि. अहमदनगर), टोळीसदस्य ओमकार सुनिल डहाळे (वय 23, रा. कोळीवाडा राहुरी जि. अहमदनगर) ,टोळीसदस्य स्वप्नील नामदेव कुसमुडे (वय 23 रा. मल्हारवाडी रोड राहुरी), टोळीसदस्य शिवा सुनिल नागरे( वय 25 रा. भाग्यश्री हटिल पाठीमागे ता. राहुरी जि. अहमदनगर) यांचेवर गैरकायदयाची मंडळी जमवुन घातक हत्यार जवळ बाळगणे, मारामारी करून दुखापत करणे एकत्र जमवुन दरोडयाची तयारी करणे, धाक दाखवून लुटमार करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे राहुरी पोलीस स्टेशनला दाखल होते.
सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधीनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कारवाई होऊन दोन वर्षाकरिता हद्दपार होणे करिता पोलीस अधीक्षक यांचकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्ताव चौकशी अधीकरी म्हणुन उपविभागीय पोलीस अधीकारी सो संदिप मिटके यांनी परिपुर्ण चौकशी करुन प्रस्तावाची सर्वांगीण चौकशी करून अहवाल प्राधीकरणाडे सादर केला होता. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सदर
आरोपींना अहमदनगर जिल्हयांतून १८ महिन्यासाठी दिनांक ५ जुन २०२३ रोजी हददपार केले बाबत आदेश काढला आहे.
तसेच दिनांक ७ जुन २०२३ रोजी रोजी कोबिंग ऑपरेशन घेवुन दरम्यान पोस्टे पाहिजे फरार असलेले आरोपी गजानन किसन आहेर (रा राहूरी) ,गौतम साहेबराव माळी (रा. राहुरी), दिलीप गोपीनाथ बेरड (रा. राहुरी), दत्तात्रय बारकु बर्डे (रा. राहुरी) यांना चेक केले असता ते मिळून आले नाहीत तसेच हिस्ट्रीशिटर्स आरोपी नामे गणेश बाबासाहेब शेटे यास चेक केले असता तो घरी मिळुन आला आहे.
तसेच नॉन बेलेबल वारंट मधील आरोपी शशिकांत बाबुराव मिसाळ,गणेश साहेबराव लिहिणार,बबलु महादेव इरले महादेव ब्रम्हा इरले हे घरी मिळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेशजी ओला,अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शानाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे, पोसई धर्मराज पाटील, पोसई सज्जकुमार नारहेडा, पोना.खरात, पोना.अमित राठोड, पोकॉ. आजिनाथ पाखरे यांच्या पथकाने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत