टायगर ग्रुपचे राहुरी तालुकाप्रमुख प्रथमेश थोरात यांचा वाढदिवस अनाथ आश्रमातील मुलांच्या सानिध्यात साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

टायगर ग्रुपचे राहुरी तालुकाप्रमुख प्रथमेश थोरात यांचा वाढदिवस अनाथ आश्रमातील मुलांच्या सानिध्यात साजरा

  राहुरी(वेबटीम) टायगर ग्रुप राहुरी तालुका प्रमुख प्रथमेश भैय्या थोरात यांचा वाढदिवस श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-दिघी रोडवरील गोखलेवाडी य...

 राहुरी(वेबटीम)



टायगर ग्रुप राहुरी तालुका प्रमुख प्रथमेश भैय्या थोरात यांचा वाढदिवस श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-दिघी रोडवरील गोखलेवाडी येथील श्री.साई विठ्ठल अनाथ आश्रम येथील चिमुकल्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.


यावेळी टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव व अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पै.बंटीभाऊ भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेले टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्षप्रथमेश थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला.


  तसेच साई अनाथ आश्रमातील  लहान मुलांना फळ व खाऊ वाटप करण्यात आले. 


या वेळी टायगर ग्रुपचे सदस्य आकाश गडाख, तेजस कराळे, सूरज शिंदे, अनिकेत चव्हाण, तेजस देवरे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत