राहुरी(वेबटीम) सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्या अहमदनगर केडगाव येथील गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणावर पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यास...
राहुरी(वेबटीम)
सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्या अहमदनगर केडगाव येथील गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणावर पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आरपीआय आंबेडकर गटाचे तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांनी दिला आहे.
राहुरीचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, अमोल राजेंद्र अल्हाट. रा. उज्जैनी पिंपळगाव, ता. नगर, जि. अहमदनगर, जगदीश छबुराव भांबळ.रा. हेलीटॉप क्राईम ब्रँच, मुंबई, अनिल योहान गायकवाड, रा. उज्जैनी पिंपळगाव, ता. राहुरी, जि. अहमदनगर. सुरेखा संजय भांबळ, संजय छबुराव भांबळ. अॅड. शोभा सुधिर रणनवरे, सागर सुधिर रणनवरे, सुरेश दौलत भांबळ, शंकर ठकसेन पटेकर, शिवाजी ठकसेन पटेकर, प्रदीप प्रभाकर मकासरे, विकी बापुजी भांबळ यांची अजिंक्य रॉबर्ट भांबळ (रा. रंगोली हॉटेल जवळ पोतदार शाळेच्या मागे अहमदनगर, केडगाव) या गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणाने २८/५/२०२३ या दिवशी व्हॉट्सअॅप वर त्याने मॅसेज व्हायरल करून बदनामी केली
अजिंक्य रॉबर्ट भांबळ याच्या विरुध्द आम्ही राहुरी येथील मे, ज्युडिशियल मैजिस्ट्रेट साहेब वर्ग १ यांचे कोर्टात भा. दं. वि. सं. कलम ४९९, ५००,५०२,५०१ प्रमाणे फिर्याद दाखल असून या फिर्यादीची प्रत या अर्जा सोबत जोडलेली आहे.
तरी आरोपी अजिंक्य रॉबर्ट भांबळ विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्याचे विरुद्ध गुन्हा नोंदवुन त्यास अटक करण्यात यावी अन्यथा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, महाराष्ट्र अध्यक्ष शशीकांत दारोळे, महाराष्ट्र सचिव महेश सुरडकर, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनाखाली तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडु असा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत