हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक असाल तर मुख्यमंत्री शिंदे व सर्व ४० जणांनी राजीनामा द्यावा.... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक असाल तर मुख्यमंत्री शिंदे व सर्व ४० जणांनी राजीनामा द्यावा....

  कोपरगाव(वेबटीम) माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली अजित पवारांनी मनमानी कारभार केला शिवसेनेच्या आमदारांना म...

 कोपरगाव(वेबटीम)



माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली अजित पवारांनी मनमानी कारभार केला शिवसेनेच्या आमदारांना मंत्र्यांना डावलून स्वतःच्या पक्षातच निधी दिला. अशी युती बाळासाहेबांना मान्य नव्हती.असा तांडव फुटल्यानंतर यांनी केला मात्र अडीच वर्ष गुपचूप सत्तेचा आनंद घेऊन तुम्ही 40 जण फुटला. आमचीच खरी शिवसेना आम्हीच बाळासाहेबांचे विचारांचे खरे वारसदार मग आज तुम्ही काय केले? त्याच अजित पवार व सहमंत्र्यांच्या शपथविधीला तुम्ही आनंदाने टाळ्या वाजवून घोषणा दिल्या.. मुख्यमंत्री शिंदे हतबल होवून गुपचूप सगळे पाहत होते, आता कुठे आहे बाळासाहेबांचा विचार द्याल का राजीनामा? आता कसे चालते राष्ट्रवादी, स्वतःचा स्वाभिमान विकून तुम्ही मिंधे झालात. यावर आज शिक्कामोर्तब झालं. ज्या बाळासाहेबांनी व पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी कुटुंबासारखं प्रेम देऊन सर्वांना जे हवं ते दिलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला.  आता जनता तुम्हाला प्रश्न विचारेल आता राष्ट्रवादी पक्ष व अजित पवार कसे चालतात, भाजपाचे खरे विचार हेच आहे का?  सत्तेसाठी ज्यांनी अटलजीचे अडवाणींचे विचार सोडले सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष केले शेतकरी, बेरोजगार, महागाई, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव वेळेत नुकसान भरपाई या फक्त घोषणा केल्या. सत्तेसाठी सुडभावनेने दबाव तंत्रांचा वापर करून फक्त राजकीय सत्ता कशी मिळवता येईल कशी टिकवता येईल यासाठीच यांनी राज्य चालवले. त्यांच्या भरोशावर तुम्ही खोटे आरोप करून स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपाच्या गटात सामील झाला. जे विचार तुम्हाला मान्य नव्हते. त्याच विचाराचे आज उपमुख्यमंत्री झाले. याचाच अर्थ तुमचे निलंबन नक्की होणार आहे सरकार पडू नये म्हणूनच भाजपाने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन पुढची सोय केली आहे अपात्र मुख्यमंत्री म्हणून बदनाम होऊन घरी बसण्यापेक्षा तुम्ही खरंच बाळासाहेबांचे शिवसैनिक असाल तर शिंदे साहेब तुमच्या सहकाऱ्यांसोबत राजीनामा द्या.....असे आवाहन अहमदनगर (उत्तर)जिल्हाप्रमुख- प्रमोद (आण्णा) लबडे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत