तर, राधाकृष्ण विखे पाटलांना मुख्यमंत्री पदाची संधी ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तर, राधाकृष्ण विखे पाटलांना मुख्यमंत्री पदाची संधी ?

 नगर: यश एस. राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आणि 2019 नंतर चौथ्यादा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी घडलेला दिसला. या घडा...

 नगर: यश एस.


राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आणि 2019 नंतर चौथ्यादा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी घडलेला दिसला. या घडामोडीत कोणाची गेम झाली, यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यातील एक चर्चा जर शेवटच्या अंकात शिंदेंचा राजीनामा झाला, तर महाराष्ट्रात कोण, ही देखील असून, यात एक नवा, तितकाच अनुभवी, अभ्यासू आणि मोदी-शहा यांना हवा असलेला मराठा चेहरा म्हणून जेष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेले दिसत आहे.
अर्थात हे करत असताना फडणवीस यांना दिल्ली दरबारात घेतले जाऊ शकते, असाही सूर आहे. 

  2024 च्या लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत, तशा तशा राजकीय घडामोडी वेगात सुरू आहे. इडी, सीबीआय इत्यादी यंत्रणा दिवसेंदिवस आणखीच अलर्ट होताना दिसत आहे, यातून अनेक बडे मासे भाजपच्या राजकीय गळाला लागत आहेत. याच शस्रातून वर्षभरापूर्वी शिवसेनेला लक्ष्य केल्याचे लपून राहिलेले नाही. शिवसेना फोडल्यानंतर काल राष्ट्रवादी फोडण्यातही दिल्लीला यश आले आहे. 

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिन्ह, पक्ष मिळूनही ग्राऊंडवरील शिवसेना खेचता आलेली नाही, शिवाय अपात्रतेची टांगती तलवार आहेच, जनतेलाही शिंदे सरकार अजून रुचत नाहीये, उद्या अपात्रतेचा निर्णय करावा लागलाच तर 16 नव्हे तर आणखी 24 आमदार अपात्र होऊन सरकार अल्पमतात येऊ  शकते, सरकार कोसळू शकते, भाजपची नामुष्की होऊ शकते. या शक्यता गृहीत धरून तसेच  लोकसभेला महाराष्ट्रात भाजप बॅकफूटवर आहे, हे देखील दिल्लीत कळून चुकले आहे, त्यामुळे बेरजेचे राजकारण म्हणून अजित पवार यांची भाजपला गरज पडली असावी, असा अंदाज  आहे.  आता अजित दादा सरकारमध्ये गेल्याने सत्तेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.ज्या पवारांवर टीका करून शिंदे गटाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, आता पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी देऊन बसण्याची वेळ शिंदे गटावर आली आहे, विस्तारही आता नजरेआड दिसत आहे, शपथ विधीसाठी घेतलेले कोट पुन्हा कपाटात ठेवून द्यावे लागतील, असेच शिंदेंच्या काही आमदारांची अवस्था  आहे. यात मुख्यमंत्री शिंदे हे देखील अजित पवारांच्या एन्ट्रीने फारसे आनंदी नाहीत, शपथ विधी वेळी ते मोबाईलमध्येच रमलेले दिसले, त्यांच्या आमदारांचे चेहरेही पडलेले दिसले. दुसरीकडे फडणवीस यांचा चेहराही खूप काही सांगून जात होता. खरंतर फडणवीस यांची मात्र भलतीच कोंडी झालेली आहे, 2019 ला संभाव्य मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची तयारी सुरू असताना ठाकरेनी नकार दिला, पुढे पहाटे अजितदादाबरोबर शपथ घेतली खरी पण काही तासातच खुर्ची सोडावी लागली, त्यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आले, मात्र आपले मनसुबे केवळ ठाकरेंमुळे धुळीस मिळाल्याचे हे शल्य फडनविस यांच्या मनात कायम होते. मग अडीच वर्षात शिंदेंना गळाला लावून रात्र रात्र जागुन, वेषांतर करून त्यांनी सरकार पाडले, मात्र ज्यावेळी शपथ घ्यायची त्यावेळी पुन्हा भ्रमनिरास झाला, त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून पक्षाने डीमोशन केले, तेही छातीवर दगड ठेवून पेलले गेले, त्या वेदना अजूनही असताना आता अजित पवार सत्तेत आले आणि त्याना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली, एकेकाळी मुख्यमंत्री असलेले फडणवीस याना आता पवारांच्या लाईनीत बसवले आहे.. त्यामुळे ह्या वेदना कमी नाहीत, म्हणूनच हे पद लवकरात लवकर सोडण्यासाठी फडणवीस आग्रही आहेत. लोकसभा तोंडावर आहेत, राज्यात भाजप शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यास फारसा इच्छुक नाही, किंवा हा धोका पत्करणार नाही, त्यामुळे आता लवकरच शिंदे यांचा राजीनामा घेतला जाईल, असा नाट्यातील शेवटचा अंक असेल, असा अंदाज आहे, मात्र त्या जागेवर फडनविस यांना पुन्हा बसवले जाईल का, की त्याना केंद्रात घेताना राज्यात मराठा चेहरा जो मोदी-शहा यांना निवडणुकीसाठी, मतांच्या बेरजेसाठी हवा आहे, तो राज्यात मुख्यमंत्री पदावर दिसेल, याविषयी आतापासूनच चर्चा सूर झाल्या आहेत. जर असे घडलेच तर यात नगरचे  राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव आघाडीवर असणार आहे, मोदी शहा यांचे ते विश्वासू समजले जातात. सहकारावर त्यांची पकड आहे. कमी वेळात पक्षात त्यांनी आपले महत्व अधोरेखित केले आहे, त्यामुळे एका गटाचा त्यांना विरोध असला तरी त्यांना सीएम पदापर्यंत पोहचण्यास आता अडचण राहिलेली नाही, असाही सूर आहे.

   वास्तविकता मोदींना लोकसभा महत्वाची आहे, त्यामुळे राज्यात काहीही तडजोडी करण्यासाठी ते तयार आहेत, शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसविण्याचा निर्णय असेल किंवा अजित पवारांना सरकारमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय, हे सर्व दिल्ली दरबारातच ठरले आहे, त्यामुळे राजकीय गरज ओळखून मोदी शहांनी उद्या शिंदेना बाजूला करून ठाकरेंनाही सोबत घेतल्यास आणि विखेंना मुख्यमंत्री पद दिल्यास फडनविस व जनतेनेही नवल वाटू देऊ नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत