उज्वल यशाबद्दल सात्रळ च्या सुपुत्रांचा ग्रामस्थांकडून सत्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उज्वल यशाबद्दल सात्रळ च्या सुपुत्रांचा ग्रामस्थांकडून सत्कार

 सात्रळ(वेबटीम) सात्रळ च्या सुपुत्रांनी  मिळविलेल्या उज्ज्वल  यशाबद्दल सात्रळ ग्रामपंचायत  व ग्रामस्थांकडून सत्कार  करण्यात आला. सात्रळ येथी...

 सात्रळ(वेबटीम)



सात्रळ च्या सुपुत्रांनी  मिळविलेल्या उज्ज्वल  यशाबद्दल सात्रळ ग्रामपंचायत  व ग्रामस्थांकडून सत्कार  करण्यात आला. सात्रळ येथील संग्राम  सतिष  पवार  यांनी नुकत्याच  जम्मू तावी येथे झालेल्या चौदाव्या व्या युवा रत्न राष्ट्रीय  कुस्ती  स्पर्धेत  14वर्ष  वयोगटातील 70 किलोगटात महाराष्ट्रास  सुवर्ण  पदक मिळून दिल्याबद्दल  तसेच याच गावातील  कन्या कु. प्रिती  भाऊसाहेब  पडघलमल  हिस राष्ट्रीय  पातळीवर  NMMS  परीक्षा 2022-23 मध्ये उत्कृष्ट  प्राविण्य  मिळाल्याबद्दल, तसेच  कु. भूमिका  स्वप्नील चोथे ही विद्यार्थिनी  NMMS  परीक्षेत ओबीसी  प्रवर्गात  उत्कृष्ट  प्राविण्य  मिळाल्याबद्दल, तसेच कु.स्नेहल    संदीप  रोकडे  हिने जे ई ई  मेन परीक्षा  बी टेक, आर्किटेक्चर परीक्षेत  82.85 टक्के गुण मिळवून ऑल इंडिया  ओबीसी  रँकिंग  मध्ये 2959 क्रमांक मिळविल्याबद्दल, प्रणव  अजित जोर्वेकर यांनी सिई टी परीक्षेत  92 पेरसेटाईल गुण मिळाल्याबद्दल, कु. सानिका  गोकुळ जोर्वेकर  हिला नीट परीक्षेत  720पैकी 666 मार्क मिळाल्याबद्दल  ग्रामपंचायत  तसेच ग्रामस्थांच्या  वतीने जेष्ठ कार्यकर्ते  प्रतापराव  कडू यांच्या हस्ते  सत्कार करण्यात  आला. या वेळी कारभारी  डुक्रे यांनी आपल्या अभिनंदन पर भाषणातून सत्कारमूर्तींचे  कौतुक  करून शुभेच्छा  दिले. या प्रसंगी सात्रळ चे सरपंच  सतीश  ताठे, साहेबराव  नालकर, विखे साखर  कारखान्याचे संचालक  बाबुराव  पडघलमल, कारभारी  डुक्रे, ग्रामपंचायत चे जेष्ठ  सदस्य  रमेश पन्हाळे, तुकारामशेट सोनार,वस्ताद तवकल भाई शेख,  योगेश  चोरमुंगे, सुभाष  गागरे, दिलीपराव  चोरमुंगे, दिगंबर  पवार, अजित जोर्वेकर, सामाजिक  कार्यकर्ते  साळू पडघलमल, भाऊसाहेब  पडघलमल, अहमदभाई शेख,  तसेच ग्रामस्थ, ग्रामपंचायत  सदस्य  मोठया  संख्येने  उपस्थित  होते. सूत्रसंचालन  विनोद  पडघलमल  यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत