मौलाना आझाद सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मौलाना आझाद सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

राहुरी(वेबटीम)  आज सोमवार दिनांक ३ जुलै २३ रोजी,   देवळाली प्रवरा येथील मौलाना आझाद सेवा प्रतिष्ठान व हजरत शहादावल मलिक दर्गा खादिम कमिटीच्य...

राहुरी(वेबटीम)




 आज सोमवार दिनांक ३ जुलै २३ रोजी,   देवळाली प्रवरा येथील मौलाना आझाद सेवा प्रतिष्ठान व हजरत शहादावल मलिक दर्गा खादिम कमिटीच्या वतीने सर्वधर्म समभावाची शिकवण जोपासले जाते, त्यानिमित्त गुरु पौर्णिमा उत्सवाचे कार्यक्रम वरवंडी येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. त्याप्रसंगी शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी सामाजिक व बौद्धिक विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर गुरुवर्य हजरत अकील बाबा पटेल यांनी भारतीय संविधान, देशभक्ती, गुरु भक्ती, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले,  

              कार्यक्रमाप्रसंगी राहुरी पंचायत समिती माजी सभापती सुरेश अप्पा निमसे डॉ. प्रशांत नालाकर, शरद टेकावडे रवींद्र पेरणे, आप्पासाहेब शेटे, आशिष ढेरे, ललित वाघ, सचिन नालकर, अलीराजा पटेल व आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले त्याप्रसंगी हजरत अकील बाबा पटेल व शाहदावल मलिक बाबा दर्ग्याचे सर्व शिष्य सांप्रदाय व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,     

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रम शाळेचे शिक्षक नानासाहेब गमे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका घावटे मॅडम व वाहाडणे सर यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत