गणेगाव येथील बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कुलच्यावतीने गुरुपौर्णिमानिमित्त दिंडी सोहळा संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गणेगाव येथील बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कुलच्यावतीने गुरुपौर्णिमानिमित्त दिंडी सोहळा संपन्न

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कुलच्यावतीने गुरुपौर्णिमा व  आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची ...

 राहुरी(वेबटीम)






राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कुलच्यावतीने गुरुपौर्णिमा व  आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची वारकरी वेशभूषेत राहुरी फॅक्टरी परिसरात  दिंडी काढण्यात आली.यावेळी ज्ञानोबा माऊली -तुकारामाच्या गजराने संपूर्ण  राहुरी फॅक्टरी परिसर दुमदुमून गेला होता. भजने, विविध भक्तिगीतांवर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण  करून महाराष्ट्राच्या संत परंपरेचे दर्शन घडविले.



 राहुरी फॅक्टरी येथील  ताहाराबाद चौक येथे श्री.व सौ.सुरेश नहार यांच्या हस्ते पालखीचे पूजन पार पडले. यावेळी श्री.व सौ. पारस नहार, श्री.व सौ.महावीर नहार व कुटुंबीय उपस्थित होते.तदनंतर दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला.

 यावेळी बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कुलचे सर्वेसर्वा दत्तात्रय वाणी, आदिनाथ वाणी , डॉ.रवींद्र वामन, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन,हर्षद ताथेड ,प्रकाश सोनी,दत्तात्रय दरंदले,प्रितेश सोळुंके,पारस नाहार,रामेश्वर तोडमल ,प्रशांत भंडारी,ऋषभ संचती,चंद्रकांत कपाळे ,अशोक टकले, ज्योती त्रिभुवन, संगीता कपाळे,  विजय सोनवणे , दत्तात्रय साळुंके आदी उपस्थित होते.


 कराळेवाडी-नगर-मनमाड मार्गावरून  टाळ मृदंग ठेका व विठूनामाचा गजर, डिजेच्या निनादात निघालेली हजारो विद्यार्थ्यांची दिंडी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहोचताच फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.



 यावेळी आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णू गीते, व्हॉइस चेअरमन आबासाहेब वाळुंज, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे , योगेश आंबेडकर, मुन्नाशेठ देसरडा, भुजाडी काका यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.प्रसंगी दत्तात्रय वाणी, बाळासाहेब वाणी, डॉ.रवींद्र वामन, पारस नहार, हर्षद ताथेड, विनोद पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले.


 यावेळी बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. कणगर येथे संतोष नहार यांच्यावतीने विद्यार्थ्यांना महाप्रसाद देण्यात आला.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य सोनिया अँथनी, उपप्राचार्य सागर कडू,सूरज घोलप,पंकज गायकवाड ,कार्तिक कोळसे, महेश गाडेकर, श्री.म्हस्के सर, श्री.सय्यद सर, श्री.अनाप सर, शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत