राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातून अपहरण झालेलेल्या दोन अल्पवयीन मुलीचा चोवीस तासात शोध घेऊन अपहरण झालेल्या मुलींची सुटका केली आहे. राहुरी...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातून अपहरण झालेलेल्या दोन अल्पवयीन मुलीचा चोवीस तासात शोध घेऊन अपहरण झालेल्या मुलींची सुटका केली आहे. राहुरी पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
राहुरी तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली असता याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरून फिरून तांत्रीक प्रथकरण करून सदर मुली पुणे रेल्वे स्टेशन येथे सुरक्षित असल्याचे खात्री होताच पुणे पोलीस यांच्याशी तात्काळ संपर्क करुन सदर मुली मिळुन आल्याने पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी व वृषाली कुसळकर व पथक यांना पाठवुन 24 तासात ताब्यात घेण्यात येऊन मुलींना नातेवाईकांकडे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेशजी ओला मा. अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर , उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पथकाने केली आहे.पुढील तपास पोसई चारूदत्त खोंडे हे करीत आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत