राहुरी (प्रतिनिधी) मणिपूर राज्यातील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करत आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी नग...
राहुरी (प्रतिनिधी)
मणिपूर राज्यातील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करत आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी नगरपरिषदच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपूरे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, देशातील मणिपूर या राज्यात महिलांच्या बाबतीत अनेक निंदनीय घटना घडत आहे. साधारणपणे ८० दिवसापूर्वी त्या ठिकाणी २ महिलांना विवस्त्र करुन त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. तसेच सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही बाब देशासाठी व आपल्या सर्वांसाठी निंदनीय व लाजिरवाणी घटना आहे. अत्याचारित महिला पैकी एक महिला कारगिल युध्दात सहभागी असलेल्या जवानाची पत्नी आहे. जो जवान देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावतो. त्या जवानाच्या कुटुंबाला मणिपूर सरकार व केंद्र सरकार संरक्षण देवू शकत नाही. ही बाब निषेधार्ह आहे. सदर बाबीचा निषेध करून मणिपूर येथील अन्याय अत्याचार थांबून त्या राज्यात शांतता निर्माण करावी. या हेतूने आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशासनास हे निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि त्या महिलांना न्याय द्यावा. अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आगाडी तालूकाध्यक्षा शारदा खुळे, अपर्णा धमाळ, वृषाली तनपुरे, उषा कोहकडे, कविता जेजुरकर, नंदा उंडे, स्वाती शिंदे, सरिता निमसे, प्राजक्ता देवकर, वैशाली तनपुरे, जयश्री मोटे, मीना पाटील, मंगल गायकवाड, प्रमिला मोटे, अश्विनी कोहकडे, प्रमिला वेताळ, इंदूमती आमटे, संगिता आहेर, संगिता धनवटे, अर्चना खामकर, विमल तमनर, राधा साळवे, वैशाली टेके, शितल भिंगारदे, राजश्री घाडगे आदि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत