राहुरी(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे विभागाच्या उपाध्यक्षपदी अंबिका माध्यमिक विद्यालय मानोरी ता,राहुरी येथील कलाध...
राहुरी(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे विभागाच्या उपाध्यक्षपदी अंबिका माध्यमिक विद्यालय मानोरी ता,राहुरी येथील कलाध्यापक पत्रकार अशोक काळे यांची निवड करण्यात आली आहे,महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र बारई यांनी अशोक काळे यांच्या नावाची घोषणा केली.
राज्याच्या 36 जिल्ह्यात कार्यान्वित असलेल्या महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ कलाध्यापकांसाठी अविरतपणे काम करीत आहे,कलाध्यापकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून प्रसंगी आंदोलने उभारून ते सोडविण्यासाठी 40 वर्षांपासून काम करीत आहे, राज्यातील अधिकृत जुनी व शासन दरबारी दबदबा असलेली संघटना म्हणून या महामंडळाची ओळख आहे,
राज्याचे अध्यक्ष नरेंद्र बारई नागपूर यांनी नुकत्याच मुबंई, पुणे,नागपूर,कोल्हापूर,औरंगाबाद,लातूर, अमरावती,नाशिक,कोंकण आदी विभागाच्या विभागीय उपाध्यक्ष व सहकार्यवाह पदाच्या निवडी जाहीर केल्या,त्यात नगर जिल्ह्यातील अशोक काळे यांना पुणे,सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील कलाध्यापक बांधवांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे,यावेळी राज्यअध्यक्ष नरेंद्र बारई,उपाध्यक्ष बलराम सामंत,सरचिटणीस दिगंम्बर बेंडाळे,कोषाध्यक्ष विजयसिंह ठाकूर,सहसरचिटणीस प्रकाश पाटील उपस्थित होते, काळे यांच्या निवडीबद्दल माजी आमदार चंद्रशेखर कदम,जेष्ठ नेते ऍड सुभाष पाटील,चाचा तनपुरे,माजी संचालक उत्तमराव म्हसे,माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,शिक्षक नेते प्रा,भाऊसाहेब कचरे सर,उत्तम खुळे, नंदकुमार दिघे,अंबिका विद्यालयाचे मुख्याध्यापक डी,आर, चव्हाण,शिक्षकप्रतिनिधी गोरक्षनाथ घुमे व शिक्षक बंधू भागिनींनी अभिनंदन केले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत