राहुरी (प्रतिनिधी) कॉलेज जीवन जगत असताना शिस्तप्रिय व प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे. जो विद्यार्थी शिस्तप्रिय व प्रामाणिक पणे आपले काम...
राहुरी (प्रतिनिधी)
कॉलेज जीवन जगत असताना शिस्तप्रिय व प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे. जो विद्यार्थी शिस्तप्रिय व प्रामाणिक पणे आपले काम करील. तो विद्यार्थी जिवनात यशस्वी होईल. असे प्रतिपादन राहुरी येथील पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी स्व. लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी केले.
आज दिनांक २६ जुलै २०२३ रोजी सकाळी स्व. लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयात पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी अचानक भेट देऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगीतले कि, विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिली पाहीजेत. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिस्तप्रीय व प्रामाणीक पणा महत्वाचा आहे. जो विद्यार्थी शिस्तीचे पालन करील, तो जीवनात यशस्वी होणार. जो शिस्तीचे पालन करणार नाही. तो विद्यार्थी जिवनात यशस्वी होईल कि नाही हे सांगता येत नाही. मी स्वतः काॅलेज जीवनात शिस्तप्रीय व प्रामाणीक पणा ठेवून शिक्षण घेतले. आणि आज पोलिस निरीक्षक पदा पर्यंत पोहोचलो.
आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. कायदे दोन प्रकारचे असतात एक केंद्रीय कायदा व दुसरा राज्याचा कायदा. कायद्याची अंमलबजावणी करणे पोलिसाचे कर्तव्य आहे. कायदा आपणच बनवतो, मग कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. गुन्हे दोन प्रकारचे आहेत. एक चुकून अनावधाने झालेला गुन्हा. दोन नियोजन बद्ध रितीने जाणूनबुजून केलेला गुन्हा. काॅलेज जीवनात आपल्या हातून नकळत एखादा गुन्हा घडला असेल तर तो नंतर नोकरी लागताना अडचणीचा ठरतो. नोकरी मिळवीण्यासाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. आपल्यावर एखादा गुन्हा दाखल असेल तर आपण नोकरी पासून तसेच शासकीय सेवेपासून वंचित राहू शकतो. त्यावेळी आपण पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने कायद्याचे भान ठेवले पाहिजे. असे मनोगत व्यक्त करून पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना कायद्या बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्या डॉ. अनिता वेताळ, उप प्राचार्य डॉ. राजेंद्र गोसावी, उप प्राचार्य मंजाबापू उ-हे, कार्यालयीन अधिक्षक विठ्ठल लांबे, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत