राहुरी(वेबटीम) शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरासह ३२ गावाच्या तालुकाप्रमुख विजय गव्हाणे यांची न...
राहुरी(वेबटीम)
शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरासह ३२ गावाच्या तालुकाप्रमुख विजय गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हंटले की, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षांतर्गत शिर्डी लोकसभा मतदार संघातील श्रीरामपूर विधानसभा कार्यक्षेत्रात समाविष्ठ असलेल्या राहुरी तालुक्यातील ३२ गावाकरीता नव्याने पदाधिकारी नियुक्ती करण्यात येत असून, आपण पक्षासाठी १९९३ पासून उपशहरप्रमुख पदी करत असलेले काम तसेच २००५ पासून शहरप्रमुख म्हणुन काम करताना पक्षहितासाठी संघटनेकरीता सातत्याने संघर्ष केला. सामान्य शिवसैनिकांच्या पाठीशी सदैव उभे राहून पक्षवाढीसाठी करत असलेल्या कामाची दखल पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी घेतली असुन, त्यांचे आदेशाने सचिव खा. विनायक राऊत, संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांचे सुचनेप्रमाणे ३२ गावासाठी तालुकाप्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल विजय गव्हाणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत