सात्रळ (वेबटीम) शासनाच्या पंतप्रधान पिक विमा योजना अभियान राबविण्यासाठी कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या शिबिरास सात्रळ, सोनगाव, ...
सात्रळ (वेबटीम)
शासनाच्या पंतप्रधान पिक विमा योजना अभियान राबविण्यासाठी कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या शिबिरास सात्रळ, सोनगाव, धानोरे, माळेवाडी, डुक्रेवाडी, तांदुळनेर येथील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत मोठया संख्येने सहभाग नोंदविला.
एकीकडे शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवश्यावर केलेली सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद इ. पिक पेरणी तसेच कपाशी लागवड मोठया प्रमाणात केलेली आहे त्यात निसर्गाची लहरीपणाचे संकट उभे राहू पाहत असल्याने शेतकरी पिक विमा उतरविण्या कडे जास्त कल दिसून येत आहे. शासनाच्या या पीकविमा अभियान जास्तीतजास्त प्रमाणात राबविण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराचे कृषी सहाय्यक श्रीमती एस. एस. बानकर तसेच ए. सी. धिमते प्रयत्नशील आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत