मांजरी येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य संघटनेचा शाखा फलक उदघाटनावरून वाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मांजरी येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य संघटनेचा शाखा फलक उदघाटनावरून वाद

  राहुरी (वेबटीम) राहुरी तालुक्यातील मांजरी बस स्टॅन्ड परिसरात वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटन ठिकाणी राडा झाल्याची घटना घडली. या प्रकरणी र...

 राहुरी (वेबटीम)



राहुरी तालुक्यातील मांजरी बस स्टॅन्ड परिसरात वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटन ठिकाणी राडा झाल्याची घटना घडली. या प्रकरणी राहुरी पोलिसात  दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


एका  फिर्यादित ग्रामसेवक सुरेश लहानु डोंगरे यांनी म्हटले की, रविवारी दुपारी  मांजरी गावातील एस.टी स्टॅन्ड परिसरात  वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य संघटना शाखा मांजरी यांनी कुठलीही परवानगी न घेता सदरचे  फलक लावून ग्रामपंचायत कार्यालयावर दगड फेक करून ग्रामपंचायत कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून १५०० रुपयांचे नुकसान केले आहे.


या प्रकरणी संदीप भीमराज बर्डे, एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष, बाळासाहेब राघू गोलवड, भाग्यश्री संदीप बर्डे(रा.मांजरी, ता.राहुरी) यांच्याविरुद्ध  सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३ व सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तर दुसऱ्या फिर्यादित  भाग्यश्री बर्डे यांनी म्हंटले की,  रविवारी दुपारी मांजरी गावात एकलव्य संघटना व वंचित बहुजन आघाडीची बैठक दुरु असताना  बाबू अण्णासाहेब विटनोर, सागर बाबुराब विटनोर, भाऊसाहेब तुकाराम विटमोर, अण्णासाहेब विटनोर, राहुल पोपट विटनोर, मिठु अण्णासाहेब विटनोर, प्रमोद भाऊसाहेब विटनोर, बाळू पोपट विटनोर, ऋतिक रावसाहेब बाचकर(सर्व रा.मांजरी)  यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत  तुम्ही इथे मीटिंग ठेवली तर तुम्हा गावात ठेवणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत