मुंबई(वेबटीम) उपमुख्यमंत्री अजित पवार गट व ज्येष्ठ नेते शरद पवार गटात आमदार खेचण्यावरून चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. शरद पवार व अजित प...
मुंबई(वेबटीम)
उपमुख्यमंत्री अजित पवार गट व ज्येष्ठ नेते शरद पवार गटात आमदार खेचण्यावरून चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. शरद पवार व अजित पवार हे आमदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. शरद पवारांबरोबर दिसणारे व मुंबईतील बैठकीला हजर असलेले अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे आज अजित पवार गटात दाखल होण्याची चर्चा सध्या सुरू आहे.
सुरुवातीला अजित पवार व इतर मंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित असणारे अकोलेचे आमदार लहामटे यांनी नंतर आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले होते. मात्र मध्यरात्री अजित पवार व लहामटे यांच्यात बैठक झाली असून अजित पवार गटाने लहामटे यांचे मन वळविण्यात यशस्वी ठरल्याची चर्चा आहे. अकोले तालुक्यात एमआयडीसी व इतर विकास कामांचे आश्वासन आमदार लहामटे यांना मिळाल्याची चर्चा आहे. लहामटे अजून मुंबईत असून अकोलेत परतल्यानंतर ते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून आपला निर्णय घेणार आहे.
अजित पवार यांनी आ.लहामटे यांना विकासाचा मुद्दा पुढे करून आपल्यात ओढणार असल्याने लहामटे हे अजित पवार गटातच जातील असे सर्वत्र बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत