राहुरी फॅक्टरी(वेबटीम) डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहुरी फॕक्टरी येथिल नुतन माध्यमिक , विद्यालयात उमेद फाउंडेशन त...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहुरी फॕक्टरी येथिल नुतन माध्यमिक , विद्यालयात उमेद फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना सुलेखनासाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
कोरोना काळात सुलेखनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावे यासाठी उमेद सोशल फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी कौतुक करुन आभार मानलेत.
यावेळीसाई आदर्श मल्टिस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श पतसंस्थेचे व्हा.चेअरमन आबासाहेब वाळूंज, व्यापारी असोसियनचे उपाध्यक्ष सुनिल विश्वासराव, देना बॕंकचे मॕनेजर तुपे साहेब, मुख्याध्यापिका सौ. सुनिता साळी, मकरंद गोलांडे, भारत पवार, योगेश दिघे, सौ. ममता निमसे,सौ कवाने आदी उपस्थित होते.
उमेद फाउंडेशन चे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, सचिव सचिन साळवे, खजिनदार संजय निर्मळ , सल्लागार ॲड. दिपक धिवर,प्रदिप बागूल,योगेश घोलप,विजय लोंढे,मुकुंद काकरे यांनी अथक परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन सौ कविता जेजुरकर यांनी केले असुन आभार प्रदिप तनपुरे सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत