राहुरी(वेबटीम) राष्ट्रीय चर्मकार महासंघ राहुरी तर्फे शहरातील बालाजी मंदिरा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा तसेच विविध योजना मार्गदर्शन क...
राहुरी(वेबटीम)
राष्ट्रीय चर्मकार महासंघ राहुरी तर्फे शहरातील बालाजी मंदिरा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा तसेच विविध योजना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
प्रारंभी संत शिरोमणी रोहीदास महाराज यांचे प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करणेत आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव घोलप (नाना), माजी समाजकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा संस्थापक राष्ट्रीय चर्मकार महासंघ होते.
सदर कार्यक्रमात एकूण ४० गुणवंत विदयार्थ्याना ट्राफी व प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.राहुरी तालुका फादर बॉडी, शिक्षक आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी या कार्यकारणीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्याची नियुक्ती प्रमाणपत्रे कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव घोलप (नाना), यांचे हस्ते देण्यात आले. तसेच उत्तर अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षा शिलाताई देशमुख यांना कार्यकारणीचे नियुक्ती प्रमाणपत्रही देण्यात आले.
एजाज पिरजादे साहेब (बाटी समतादूत) यांनी समाजासाठी विविध योजनांचे मार्गदर्शन केले. धनंजय जाधव (पोलिस निरीक्षक, राहुरी) यांनी गुणवंत विदयार्थ्यानी आपला शिक्षणाचा आलेख अधिकाधिक का वाढविता येईल याबबद्दल मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच माजी आ. भाऊसाहेब कांबळे , अशोक कानडे,शशिकांत सोनवणे यांनी आपले भाषणातून मार्गदर्शन केले..
यावेळी उषाताई तनपुरे (मा. नगरध्यक्षा राहुरी न.पा.) माजी आ. भाऊसाहेब कांबळे,श्री रावसाहेब खेवरे (सहसंपर्क प्रमुख नगर दक्षिण लोकसभा शिवसेना), दत्तात्रय गोतिसे (सचिव,राष्ट्रीय चर्मकार महासंघ), ज्ञानेश्वर कांबळे, (राज्य सचिव, राष्ट्रीय चर्मकार महासंघ),शशिकांत सोनवणे, गणेशदादा भांड( अध्यक्ष चैतन्य उदयोग समुह), एजाज पिरजादे साहेब (बार्टी, समातादूत) तसेच मनिषाताई पोटे, संतोष कांबळे, दिलीप कानडे,अशोक कानडे, दत्ता दुशिंग,डॉ. अनंतकुमार शेकोकर, अशोक आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब साळवे सर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती मनिषाताई पोटे, राजाभाऊ कावळे, उत्तम कदम, श्री कैलास चिंधे, विजय कांबळे, जिजाबा चिंधे, बाळासाहेब साळवे सर, एकनाथ सोनवणे सर,अण्णासाहेब देवरे, अमोल कदम, अदिक सोनवणे सुरेश झारेकर, बबन शेलार, मच्छिद्र देशमुख, श्रीमती योगिता तुपे, लक्ष्मण तुपे, सौ शिलाताई देशमुख श्री जालिंदर देशमुख, श्री विजय तेलोरे श्री राजेंद आहेर श्री बापुसाहेब जाधव सर, डॉ.शेकोकर श्री कैलास ठोकळे, श्री प्रसाद कांबळे, श्री प्रशांत लोखंडे, श्री अभिषेक साळवे यांचे सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत