कोपरगाव(हेमचंद्र भवर) सांगली येथील तीन गितप्रेमी मित्र आजरा सुत गिरणीचे एम डी चंद्रशेखर फडणीस, वारणा दुधचे एम डी दिलीप माळी, नाट्यकर्मी समाज...
कोपरगाव(हेमचंद्र भवर)
सांगली येथील तीन गितप्रेमी मित्र आजरा सुत गिरणीचे एम डी चंद्रशेखर फडणीस, वारणा दुधचे एम डी दिलीप माळी, नाट्यकर्मी समाजसेवक प्रशांत जोशी यांनी गरिबी गरजू व्याधीग्रस्तांचया आर्थिक मदतीसाठी गितगायनाचया कार्यक्रमांचे आयोजन करून आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेतला.
आजतागायत पंधराशे कार्यक्रम संपन्न झाले. नुकताच कोपरगाव शहरातील जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समितीच्या वतीने आयोजित समारंभात भरघोस प्रतिसाद मिळाला.
स्वागत व प्रास्ताविक सौ वृंदा को-हाळकर यांनी केले. कार्याध्यक्ष विजय बंब उत्तम भाई शहा डॉ विलास आचारी सुवालाल भंडारी द्वारकानाथ मुंदडा संगीत विद्यालयाचे केतन कुलकर्णी, सौ कुलकर्णी, एड पुनम गुजराथी संजय को- हाळकर ह भ प जगन्नाथ महाराज थोरे साहित्यिक हेमचंद्र भवर प्रमोद येवले विजय कासलीवाल संजय महानुभाव आशुतोष पटवर्धन, सखी महिला समितीच्या सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रसंगी सत्तर, ऐंशीच्या दशकातील श्रवणीय सदाबहार गितांसह देशभक्तीपर गितगायन संपन्न होऊन रसिकांना गितश्रवणाची मेजवानी मिळाली.
कोपरगाव प्रमाणेच शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रम, डॉ जोशी यांच्या मन स्वास्थ केंद्र, साई आश्रया अनाथाश्रम येथेही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संगीत व ध्वनी व्यवस्था अनिल गिडडे यांनी दिली होती. चारही कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वीतेसाठी सौ. वृंदा को-हाळकर, सौ. सुधा भाभी ठोळे डॉ विलास आचारी यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत