राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आज नगर जिल्हा दौऱ्यावर असताना नगरवरून शिर्डीकडे जाताना राहुरी फॅक्टर...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आज नगर जिल्हा दौऱ्यावर असताना नगरवरून शिर्डीकडे जाताना राहुरी फॅक्टरी येथे त्यांच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी जोरदार तयार केली होती. यावेळी कार्यकर्त्यांचा सन्मान घेऊन ते तातडीने शिर्डीकडे साईबाबा दर्शनासाठी रवाना झाले. कार्यकर्त्यांना वेळ कमी दिल्याने त्यांचा हिरमोड झाला.
अमित ठाकरे नगरवरून शिर्डीकडे जाताना राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी स्मारक येथे अभिवादन करणार या दृष्टीने स्थानिक पदाधिकारी व सैनिकांनी फ्लेक्सबाजी, फटाके व इतर नियोजन केले.
मात्र अमित ठाकरे यांनी नगर-मनमाड मार्गावर आपल्या वाहनांचा ताफा काही क्षण थांबवून सन्मान घेत शिर्डीकडे साई मंदिरात दर्शनासाठी रवाना झाले. रात्री ८ पर्यंत शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेणार होते असे समजते.
अनेक कार्यकर्ते व हितचिंतक, नागरिक आपल्या मोबाईलमध्ये अमित ठाकरे यांच्यासमवेत सेल्फी घेण्यासाठी बऱ्याच वेळापासून उपस्थित होते. मात्र अमित ठाकरे यांचा ताफा काही क्षण थांबत तातडीने पुढे शिर्डीकडे रवाना झाल्याने उपस्थितांचा हिरमोड झाला.
अमित ठाकरे उद्या रविवारी शिर्डी विश्रामगृह येथे उत्तर नगर जिल्हयाची बैठक घेणार असून या बैठकीत राहुरीतील पदाधिकाऱ्यांची संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेणार असल्याचे मनसेच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत