राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्ष पदी तांदुळवाडी येथील पत्रकार विनित आनंदराव धसाळ यांची न...
राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्ष पदी तांदुळवाडी येथील पत्रकार विनित आनंदराव धसाळ यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिफारशीनुसार तसेच जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी राहुरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची निवड केली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून विनित धसाळ (सामाजिक क्षेत्र), सदस्य पदी किरण ससाणे (अनु.जाती), सौ.वैशाली उत्तमराव खुळे (महिला), अविनाश बाचकर (विमुक्त जाती/ भटक्या जमाती), अजित डावखर (सर्वसाधारण), सर्जेराव घाडगे (अपंग), गोरख अडसुरे (स्व.संस्था प्रतिनिधी), संदीप आढाव (सामाजिक), नारायण धनवट (जेष्ठ नागरिक), दिपक वाबळे (इतर मागास प्रवर्ग), गटविकास अधिकारी, पंचायत समिती, राहुरी, (शासकीय सदस्य), तहसीलदार राहुरी सदस्य-सचिव अशी नियुक्ती करण्यात आली आहे.
नूतन अध्यक्ष विनित धसाळ व सर्व समिती सदस्य यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. शिंदे-फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादीच्या ना.अजित पवार यांच्या गटाचा समावेश झाल्याने संबंधित तिनही पक्षाच्या गटातील कार्यकर्त्यांना सामावून घेऊन राहुरी तालुक्यातील व जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय योजनांमधील अशासकीय सदस्यांची निवड लवकरच करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत