नगर जिल्ह्यातील ६ ग्राम पंचायतीना केंद्र स्तरावरील पडताळणीसाठी नामांकन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर जिल्ह्यातील ६ ग्राम पंचायतीना केंद्र स्तरावरील पडताळणीसाठी नामांकन

अहमदनगर - वेबटीम  स्वच्छ सर्व्हेक्षण  (ग्रामिण) 2023 अंतर्गत जिल्ह्यातील हिवरे बाजार ता. नगर , लोणी बु ता राहाता , खडके वाके ता, राहाता गोगल...


अहमदनगर - वेबटीम


 स्वच्छ सर्व्हेक्षण  (ग्रामिण) 2023 अंतर्गत जिल्ह्यातील हिवरे बाजार ता. नगर , लोणी बु ता राहाता , खडके वाके ता, राहाता गोगलगाव ता. नेवासा     तीगाव ता संगमनेर गणोरे ता. अकोले या ६ ग्रामपंचायतीचे नामांकन केंद्र स्तराकरीता झाले असुन दि.१ ते २० ऑगस्ट २०२३ दरम्यान केंद्र स्तरीय समितीच्या माध्यमातून तपासणी होणार आहे, अशी माहीती श्री.आशिष येरेकर मुख्य कार्येकारी अधिकारी , जिल्हा परिषद अहमदनगर यांनी दिली आहे.

स्वच्छ सव्हेंक्षण ( ग्रामीण) २०२३ अंतर्गत जिल्हयातील १५ ग्रामपंचायतीची राज्यस्तराकरीता जिल्हासरावरून निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या १५ ग्रामपंचायतीची ५ ते ९ जुलै २०२३ या कालावधीत राज्यस्तर तपासणी समितीच्या माध्यमातून तपासणी पुर्ण करण्यात आली होती

   उल्लेखनीय बाब म्हणजे राज्य स्तरावरून केंद्र स्तरावर पडताळणी करण्या करीता फक्त ३२ ग्राम पंचायतीची शिफारस करण्यात आली असुन त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ६ ग्रामपंचीची  निवड करण्यात आली आहे

केंद्र स्तरावरून करण्यात येणाऱ्या तपासणी मध्ये वैयक्तीक शौचालय बांधकाम व वापर, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी स्वच्छता, गावातील स्वच्छतेबाबत जाणीव जागृती याबाबत तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती  समर्थ शेवाळे, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन  जिल्हा परिषद अहमद नगर यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत