राहुरी(प्रतिनिधी) राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना यांच्यावतीने युवासेना कॉले...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना यांच्यावतीने युवासेना कॉलेज कक्ष सुरू करण्यात आला असून या शाखा फलकाचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.
यावेळी युवासेना कोअर कमिटी मेंबर अंकीतजी प्रभु, विभागीय सचिव विराजजी कपाडिया, युवासेना विस्तारक अजयजी वन्होळे यांच्या हस्ते तर शिवसेना सहसंपर्कप्रमुख रावसाहेब नाना खेवरे, युवासेना जिल्हाप्रमुख रविभाऊ वाकळे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन म्हसे, युवा सेना तालुका प्रमुख रोहन भुजाडी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवासेना कॉलेज कक्ष शाखा राहुरी कॉलेजचे शाखाप्रमुख प्रताप(निलेश) गुंजाळ, शाखा सरचिटणीस ज्ञानेश्वर वाणी, उपशाखाप्रमूख संकेत कदम, सिद्धार्थ घोडके, शाखा समनव्यक कार्तिक भिंगारकर, अभिषेक तनपुरे, शाखा सचिव रोहित कोपनर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवा सेना तालुकप्रमुख रोहन भुजाडी म्हणाले की, शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुक्यातील सर्व महाविद्यालयात युवा सेना कॉलेज कक्ष स्थापन करण्यात येणार असून यामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने विविध उपक्रम, स्पर्धा राबविल्या जाणार आहेत.तसेच कॉलेजमधील विद्यार्थीनीची होणारी छेडछाड, रॅगिंग यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी युवासेना कॉलेज कक्ष सतर्क राहील तसेच तालुक्यातील गावोगावी युवा सेना शाखा उघडल्या जाणार असल्याचे सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत