डॉ.तनपुरे कारखाना पेट्रोल पंपावरील कामगारांना मारहाण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ.तनपुरे कारखाना पेट्रोल पंपावरील कामगारांना मारहाण

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- चाळीस रुपयाचे माझ्या गाडीत पेट्रोल टाक माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणत पेट्रोल पंप चालक कामगाराने पेट्रोल भरण्यास नका...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

चाळीस रुपयाचे माझ्या गाडीत पेट्रोल टाक माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणत पेट्रोल पंप चालक कामगाराने पेट्रोल भरण्यास नकार दिल्याने पेट्रोल पंप चालक कामगार व इतर कामगारांना शिवीगाळ करत लोखंडी पाईप,लाकडी दांड्याने मारहाण करत पेट्रोल पंप चालक कामगाराकडे असलेल्या सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करत कामगारांना गंभीर दुखापत केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिघांसह अन्य आठ ते नऊ इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखाना पेट्रोल पंप येथे काल रविवार दि. ३० जुलै रोजी दु. साडे तीन वाजेच्या दरम्यान आरोपी हे पेट्रोल पंपावर येऊन ४० रुपयांचे पेट्रोल माझ्या गाडीत टाक माझ्याकडे पैसे नाही पेट्रोल पंपावरील कामगाराने पैसे असेल तरच पेट्रोल टाका अन्यथा पेट्रोल टाकणार नाही असे म्हणण्याचा राग आल्याने पेट्रोल पंपावरील कामगारांना शिवीगाळ मारहाण करत पेट्रोल विक्रीचे कामगाराकडे असलेले दीड लाख रुपये घेऊन कामगाराचा मोबाईल फोडून गंभीर गंभीर दुखापत केल्याप्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील तेजस वाघ उर्फ नासक्या, टिंक्या अशोक वडमारे,गणेश तारडे (पूर्ण नाव माहित नाही) सर्व राहणार राहुरी फॅक्टरी व इतर आठ ते नऊ इसमांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात फरान इमरान खान यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं ८३१/२०२३ भा.द.वि

 कलम ३२६,१४३,१४७, ,१४८,१४९,३२७,३२४,३२३,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी.डी कटारे हे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत