देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील इनामवस्ती येथील १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडा...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील इनामवस्ती येथील १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निकिता सुनील बर्डे(वय-१५) असे मृत अल्पवयीन तरुणीचे नाव आहे. निकिता बर्डे हीचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्यानंतर रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत म्हणून कळविले. याबाबत ग्रामीण रुग्णालयातील मेमोनुसार राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.बी.यादव हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत