देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील वाकण-वस्ती रोडवरील ग्लोबल विसडम स्कुलच्या ११ विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्हा ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील वाकण-वस्ती रोडवरील ग्लोबल विसडम स्कुलच्या ११ विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्हा किक बॉक्सिंग स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय किक बॉक्सिंगसाठी निवड झाली आहे.
ग्लोबल विसडम स्कुलचे क्रीडा शिक्षक स्वप्नील खरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्कुलच्या ११ विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरिय किक बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ.कोठुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सीमा वाणी, शीतल झिने, प्रतिभा ढुस, स्नेहल मुसमाडे, वैशाली देवतरसे, अश्विनी गाढे, संगीता क्षीरसागर , सुनीता मुसमाडे, गोविंद मुसमाडे, मच्छीन्द्र माळवदे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत