राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथे गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरी जाण्याच्या घटना घडत असल्याने नागरिक व व्यापारी वर्गातून संताप व्यक्त ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथे गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरी जाण्याच्या घटना घडत असल्याने नागरिक व व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होत असून दुचाकी चोरांचा तातडीने शोध लावावा अन्यथा आंदोलन छेडु असा इशारा श्रीशिवाजीनगर व्यापारि असोसिएशन व नागरिकांकडून पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
राहुरी फॅक्टरी येथील शामराव खडके यांची बजाज प्लॅटिना, किशोर देसरडा यांची डिस्कव्हर, विशाल बोर्डे यांची पॅशन तर काल स्वराज विष्णू गीते यांची बुलेट दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून तातडीने चोरांचा शोध लावावा अन्यथा नगर-मनमाड रोडवर आंदोलन छेडु असा इशारा पोलीस निरीक्षक जाधव यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
यावेळी साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णू गीते, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, राहुरी अर्बन क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रशांत काळे, आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे, व्यापारी संघटनेचे सुनील विश्वासराव, प्रसाद लोखंडे, बबलू गाडे, संभाजी औटी, शामकांत खडके, विशाल बोर्डे आदिंसह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत