कोपरगाव(हेमचंद्र भवर) कोपरगाव शहर व तालुका फोटोग्राफर एकता ग्रुप यांच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिन सामाजिक कार्याने साजरी करण्यात आला . ...
कोपरगाव(हेमचंद्र भवर)
कोपरगाव शहर व तालुका फोटोग्राफर एकता ग्रुप यांच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिन सामाजिक कार्याने साजरी करण्यात आला .
जागतिक छायाचित्रकार दिन हा दिवस दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.यादिवशी जगातील प्रथम छायाचित्राचा शोध लागला होता..फोटोग्राफर उत्साही जगभरातून एकत्र येऊन फोटो काढण्याची कला साजरा करतात. फोटोग्राफीच्या विज्ञानाने संपूर्ण मानवी इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे. आज आपल्याकडे ऐतिहासिक क्षणांच्या नोंदी आहेत कारण ते छायाचित्रांमध्ये टिपले गेले आहेत.छायाचित्रकरांनी आजकोपरगाव शहर व तालुका फोटोग्राफर एकता ग्रुप यांच्या छायाचित्रकरांनी आपले समाजाला काही देणे लागतो या सामाजिक भावनेतून पद्मा मेहता प्राथमिक शाळेस 3 dust box भेट देण्यात आले.या प्रसंगी मुख्याध्यापक सुभाष दरेकर यांनी प्रास्ताविक केले व या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.सौ.आव्हाड मॅडम यांनी केले.
तसेच यावेळी कोपरगांव तालुका पोलिस स्टेशन चे सहायक फौजदार गजानन वांडेकर, पत्रकार बिपिन गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पुजन करण्यात आले.यावेळी जेष्ठ फोटोग्राफर हेमचंद्र भवर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी फोटोग्राफर यांची पूर्वीची व आत्ताच्या कलेची व आर्थिक परिस्थितीची माहिती दिली. यावेळी शाळेच्या च्या वतीने सर्व छायाचित्रकरांचा सन्मान करण्यात आला. तसेच आज रोजी शाळेत मेहंदी स्पर्धा निमित्त युसुफ रंग रेज आणी हेमचंद्र भवर तसेच एकता फोटोग्राफर ग्रूप यांचे वतीने रोख स्वरूपात पारितोषिके देण्यात आली.
याप्रसंगी S9 चे प्रतिनिधी पत्रकार युसुफ रंगरेज, महेश नाईक,अरूण कदम, प्रवीण आभाळे, नंदू पंडोरे,सागर पवार, ,मयुर चव्हाण, हेमचंद्र भवर, नाजगड-, राजू शेख, तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते..


कोणत्याही टिप्पण्या नाहीत