पानेगांव ( वार्ताहर)- नेवासा तसेच राहुरी तालुक्यातील वरदान ठरलेल्या मुळा नदीवरील केटीवेअर तसेच गांवतळे यशवंत बंधारे तातडीने भरुन द्या अशी म...
पानेगांव ( वार्ताहर)-
नेवासा तसेच राहुरी तालुक्यातील वरदान ठरलेल्या मुळा नदीवरील केटीवेअर तसेच गांवतळे यशवंत बंधारे तातडीने भरुन द्या अशी मागणी मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप उपाध्यक्ष भाऊसाहेब विटनोर यांनी मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचा पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
जवळपास तीन महिने उलटून हि ह्या परीसरात पाऊसाने हूलकावणी दिली असून पिकांसाठी तसेच जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पिकं अखेरच्या घटका मोजत आहे शेतकऱ्यांनी कपाशी,सोयाबीन, ऊस ,घास,मका आदी पिकं उभा करण्यासाठी मोठा खर्च केला असून बॅंके कडून कर्ज तसेच सोने तारण ठेवून उभा केला आहे.हातातोंडी आलेला घास हिरावून जात असून मुळा धरणात मोठ्या प्रमाणावर जवळपास २२टीमसी पाणी साठा असून येथील मानोरी,पानेगांव-मांजरी, अंमळनेर केटीवेअर बंधारे,गांवतळे यशवंत बंधारे भरुन दिल्यास या परीसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पाटबंधारे विभागाला तातडीने आदेश देण्यात यावे अशी मागणी मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप उपाध्यक्ष भाऊसाहेब विटनोर यांनी केली आहे.
यावेळी कार्याध्यक्ष नानासाहेब जुंधारे, विलास सौंदोरे योगेश पवार, चंद्रकांत टेमक चंद्रकांत माकोणे, पंढरीनाथ घावटे,विजय जंगले, विठ्ठल जाधव, अप्पासाहेब जाधव कैलास जाधव,यमनाथ जाधव,भिकाजी जगताप, विनायक माकोणे, दिगंबर जाधव,भगिरथ जाधव, ज्ञानेश्वर आयनर, सतिश फुलसौंदर, जालिंदर जंगले,रणछोडदास जाधव, शामराव आढाव, माऊली खुळे,संजय पवार, सुनिल हिवाळे, राजेंद्र जंगले,शिवाजी जाधव,विजय विटनोर मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचे सचिव बाळासाहेब नवगिरे आदी उपस्थित होते.
मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचे सर्व पदाधिकारी सभासद पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपूरे यांना भेटून येथील पाण्याची झालेली गंभीर परिस्थितीमुळे पिकं धोक्यात आले आहे यामुळे जनावरांच्या चारा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे तातडीने मुळाधरणातुन केटीवेअर यशवंत बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात यावे
दत्तात्रय पाटील घोलप

कोणत्याही टिप्पण्या नाहीत