राहुरी(वेबटीम) आगामी निवडणूका भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत . या निवडणूकी घवघवीत यश मिळविण्यासाठी भाजपाने संघटनेत बदल घड...
राहुरी(वेबटीम)
आगामी निवडणूका भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत . या निवडणूकी घवघवीत यश मिळविण्यासाठी भाजपाने संघटनेत बदल घडवत , नव्या जुन्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मेळ साधण्याचा प्रयत्न चालविला आहे . कार्यकर्त्यांना राज्य , जिल्हा , तालुका , युवामोर्चा तसेच विविध आघाड्यांमध्ये पद देऊन पक्षसंघटना बळकट करणार असल्याचे भाजपाचे राज्य उपाध्यक्ष तथा प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्पष्ट केले .
वाळकी ( ता . नगर ) येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या मेळाव्यात दक्षिणेतील तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखती साठी आलेल्या इच्छुकांना मार्गदर्शन करताना प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी बोलत होते . यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले , प्रदेश चिटणीस अरुण मुंडे , जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडीक , विक्रम पाचपुते , प्रताप पाचपुते , बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपस्थित होते .
येथील जिल्हा कार्यालयात तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी , चिटणीस अरुण मुंडे यांनी घेतल्या . यावेळी राहुरी तालुक्यात १७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.
यामध्ये सुरेश बानकर, सर्जेराव घाडगे, सुभाष गायकवाड, रवींद्र म्हसे, महेंद्र तांबे, शहाजी कदम, नानासाहेब गागरे, सुकुमार पवार, संदीप गिते, विजय कानडे, अनिल आढाव, प्रभाकर हरिचंद्रे,धीरज पानसंबळ, मच्छिंद्र गावडे, संतोष ढोकणे, चांगदेव किनकर, सुजय काळे, नाना तरवडे आदींनी तालुका अध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्या.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत