राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गावर असलेल्या गवळी माळ येथील कर्मवीर अकॅडमी येथून उद्या गुरुवार १७ ऑगस्ट रोजी पह...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गावर असलेल्या गवळी माळ येथील कर्मवीर अकॅडमी येथून उद्या गुरुवार १७ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता आजी माजी विद्यार्थ्यांची पायी दिंडी शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होणार आहे.
मेजर राजेंद्र कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कर्मवीर अकॅडमी येथे पोलीस व सैन्य भरतीचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अध्यात्मिक गोडी लागावी या हेतूने कर्मवीर अकॅडमी भव्य दिव्य साई मंदिर उभारण्यात आले असून दररोज आरती संपन्न होते.
दरम्यान उद्या गुरुवार दि १७ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता कर्मवीर अकॅडमी साई बाबा मंदिर ते श्री. क्षेत्र शिर्डी पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला असून या दिंडीत आजी-माजी प्रशिक्षणार्थी व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत