राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखान्याच्या ४० सेवानिवृत्त कामगारांचा सपत्नीक सन्मान राष्ट्रीय साखर कामगार यु...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखान्याच्या ४० सेवानिवृत्त कामगारांचा सपत्नीक सन्मान राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्यावतीने संपन्न झाला
६भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रथम कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून कामगार भवन इमारतीजवळ ध्वजारोहण युनियनचे अध्यक्ष गजानन निमसेयांचे शुभहस्ते व सर्व कामगार युनियन पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
साई आदर्श मल्टीस्टेटच्या सभागृहात कारखान्याच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या ४० कर्मचा-यांचा सपत्नीक सन्मान सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गजानन निमसे होते. यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे व योगप्रशिक्षक किशोर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण युनियनचे सेक्रेटरी सचिन काळे गुरू यांनी केले. यावेळी इंद्रभान पेरणे, कारभारी खुळे, चंद्रकांत कराळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय साखर कामगार युनियन उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सेक्रेटरी सचिन काळे , नामदेव धसाळ, सिताराम नालकर, बाळासाहेब तारडे,रामभाऊ ढोकणे , सुरेश तनपुरे,नामदेव शिंदे, सांगळे , ईश्वर दूधे, रावसाहेब ढुस,वसंत बर्डे, कामगार कृतीसमिती अध्यक्ष सुरेश थोरात, विलास तमनर , गोरक्षनाथ पवार, सुरेश आदमाने आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव शेटे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत