राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील मुळा डॅम फाटा येथे दुचाकी व पिकअपच्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील देव...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील मुळा डॅम फाटा येथे दुचाकी व पिकअपच्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील देवळाली प्रवरातील साहिल सत्तार शेख(वय-२३) तर सौरभ शरद काळे(रा.भानसहिवरे, ता.नेवासा, वय-२४) हे दोघे ठार झाल्याची घटना घडली.
साहिल शेख, सौरभ काळे व त्यांचा अन्य एक मित्र हे दुचाकीवर नगरवरून राहुरीकडे येत असताना मुळा डॅम फाट्याजवळ अज्ञात वाहन व दुचाकी यांच्यात अपघात झाला.
या अपघातात देवळाली प्रवरातील साहिल शेख व भानसहिवरे येथील सौरभ काळे ठार झाले आहेत. तर कोल्हार येथील युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी स्थानिक नागरिक व देवळाली प्रवरातील रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांनी मदतकार्य केले.मयत साहिल शेख हा कॉम्रेड मदिना शेख यांचा पुतण्या तर आयशा शेख यांचा मुलगा आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत