राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राहुरी फॅक्टरी-टाकळीमिया रोडवरील चारी नंबर ४ गणपती चौक येथे श्रावणमासानिमित...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राहुरी फॅक्टरी-टाकळीमिया रोडवरील चारी नंबर ४ गणपती चौक येथे श्रावणमासानिमित्त नवनाथ हरिनाम सप्ताहास आज २२ ऑगस्ट पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.
या सप्ताहानिमित्त काकडा आरती झ ग्रँथ वाचन, हरिपाठ, प्रवचन , महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सप्ताह काळात दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत प्रवचन संपन्न होणार असून २२ ऑगस्ट रोजी सुभाष महाराज विधाटे, २३ ऑगस्ट रोजी शारदाताई महाराज फोफसे, २४ ऑगस्ट रोजी आबा महाराज कोळसे, २५ ऑगस्ट रोजी भास्कर महाराज पागिरे, २६ ऑगस्ट रोजी नामदेव महाराज शास्त्री, २७ ऑगस्ट रोजी उंबरकर महाराज, २८ ऑगस्ट रोजी दुर्गाप्रसाद महाराज तिडके यांची प्रवचन सेवा होणार आहे.
मंगळवार दि २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प कु.गीतामाई धसाळ(तांदूळवाडी) यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
या साप्ताहासाठी परिसरातील दानशूर मंडळी व टाळकरी , वारकरी व भाविकांचे सहकार्य लाभणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत