मानोरीतील सेवानिवृत्त शिक्षकाच्या आत्महत्याप्रकरणी सुनेसह प्रियकर व माहेरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मानोरीतील सेवानिवृत्त शिक्षकाच्या आत्महत्याप्रकरणी सुनेसह प्रियकर व माहेरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील मानोरी येथील सेवानिवृत्त शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणी सुनेसह तिचा प्रियकर आणि सुनेच्या माहेरच्या नातेवा...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील मानोरी येथील सेवानिवृत्त शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणी सुनेसह तिचा प्रियकर आणि सुनेच्या माहेरच्या नातेवाईकांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



      मानोरीत मंगळवारी पहाटेच्या दरम्यान ६५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक सोन्याबापू बाबुराव बरबडे यांनी आपल्या राहत्या घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 


याप्रकरणी मयत बरबडे यांचा मुलगा शिवाजी सोन्याबापू बरबडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी चंद्रभान राधाकृष्ण ढेरे (व्याही), संजय राधाकृष्ण ढेरे( चुलत व्याही), विशाखा शिवाजी बरबडे (सुन), विजयकुमार विलास चव्हाण (सुनेचा प्रियकर) यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.९४९,२०२३ नुसार भादवी कलम ३०६,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे हे करत आहे.



      सोन्याबापू बरबडे यांचा मुलगा शिवाजी बरवडे हा व्यवसानिमित्ताने पुण्यात राहत होता. त्याचा विवाह आरडगाव येथील ढेरे कुटुंबातील विशाखाशी झाला होता. विवाह नंतर काही दिवस त्यांचा सुखाचा संसार झाला त्यातून त्यांना दोन मुली देखील आहेत. मात्र गेल्या काही वर्षापासून पुण्यामध्ये त्यांच्या सुनेचे  विजयकुमार चव्हाण यांच्यासोबत प्रेमसंबंध जुळले त्यानंतर आपल्या दोन मुलीला घेऊन सोन्या-चांदीच्या दागिण्यासह पैसे घेऊ  विजयकुमार सोबत पळून गेली होती. त्यानंतर तिने वेळोवेळी तिच्या पतीला व तिच्या सासऱ्याला पैशाची मागणी करूण ञास देत होती. त्यात तीला तिच्या माहेरचे लोक व तिचा प्रियकर देखील मदत करत होता. घटस्फोटासाठी अर्ज करूनही विशाखा घटस्फोट देत नव्हती तर बरबडे यांना वारंवार फोन करून तुमच्या मुलाचा काटा काढून आम्ही तुमची सर्व संपत्ती हडप करणार आहोत. अशा प्रकारच्या वारंवार येणाऱ्या धमक्यांना घाबरून सेवानिवृत्त शिक्षक बरबडे हे मानसिक तणावात होते.  यातुनच त्यांनी आत्महत्या केली असून माझ्या मृत्यूस हेच लोक कारणीभूत असल्याने आता ४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत