राहुरी(वेबटीम) उधार पेट्रोल देण्यास नकार दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून दीड लाखांची रक्कम लुटणाऱ्या घटनेतील दोघा आरोप...
राहुरी(वेबटीम)
उधार पेट्रोल देण्यास नकार दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून दीड लाखांची रक्कम लुटणाऱ्या घटनेतील दोघा आरोपीना राहुरी पोलिसांनी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातून ताब्यात घेतले आहे.
रविवारी दुपारी फॅक्टरी येथील तनपुरे कारखाना पेट्रोल पंपावर उधार पेट्रोल टाकण्यास नकार दिला म्हणून कामगारांना बेदम मारहाण करून दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान यातील दोन आरोपी राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथे त्यांच्या घरी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे व पोलीस हेडकोन्स्टेबल डी ए गर्जे यांनी दोन आरोपीना ताब्यात घेतले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत