राहुरी(प्रतिनिधी) राहुरी शहरात सकल हिंदू समाजाच्यावतीने ५ ऑगस्ट रोजी आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी शहरात सकल हिंदू समाजाच्यावतीने ५ ऑगस्ट रोजी आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी आज राहुरी येथे भेट देऊन मोर्चा मार्गाची पाहणी करून इतर आवश्यक सूचना केल्या.
लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधी कायदा संपुर्ण देशात लागू करण्यासाठी व उंबरे येथील घटनेचा निषेध म्हणून ५ ऑगस्ट रोजी राहुरी शहरातील वाय एम सी ग्राउंड येथुन मोर्चा निघणार असून शहरातील मुख्य पेठेतील जुन्या सरकारी दवाखान्यात सभेत रूपांतर होणार आहे.
याच अनुषंगाने आज अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी राहुरीतून येऊन मोर्चा मार्गाची पाहणी केली तसेच सीसीटीव्ही यंत्रणा व इतर आवश्यक त्या सूचना केल्या.
यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत