राहुरी पोलीस ठाण्यात बालगोपालांना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व सहकाऱ्यांनी दिली शस्त्रांविषयी माहिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी पोलीस ठाण्यात बालगोपालांना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व सहकाऱ्यांनी दिली शस्त्रांविषयी माहिती

राहुरी(प्रतिनिधी)  भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडावंदन नंतर पोलीस ठाणे व आरोपींची कोठडी पाहण्यासाठी आलेल्या बालगोपाळांना राहुरी...

राहुरी(प्रतिनिधी)



 भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडावंदन नंतर पोलीस ठाणे व आरोपींची कोठडी पाहण्यासाठी आलेल्या बालगोपाळांना राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजन करून शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली. 



पोलीस विभागाकडून जमाव पांगवण्यासाठी वापरण्यात येणारी गॅस गन, मशीन कारबाईन, तसेच चीन- पाकिस्तान सीमेवर जवानांकडून वापरण्यात आलेली एस. एल. आर. रायफल विषयी देखील माहिती देण्यात आली. 


सदर शस्त्रास्त्राविषयी मुलांना अतिशय उत्सुकता दिसून आली.

विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रे दाखवण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव, पोलीस उपनिरीक्षक खोंडे, पो . हवा. ठाणगे, महिला पोलीस नाईक कोहकडे, पो. ना. जालिंदर साखरे, पो. कॉ. आदिनाथ पाखरे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत