बलात्कार गुन्ह्यातील पोलीस उपनिरीक्षकाच्या अटकेच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बलात्कार गुन्ह्यातील पोलीस उपनिरीक्षकाच्या अटकेच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा

  राहुरी(वेबटीम) बलात्कार गुन्ह्यात फरार असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा यास अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी फिर्यादी ...

 राहुरी(वेबटीम)



बलात्कार गुन्ह्यात फरार असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा यास अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी फिर्यादी महिलेने उद्या १५ ऑगस्ट रोजी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई मंत्रालयासमोरील दलनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तसे पत्र या पीडित महिलेने सरकार दरबारी पाठविले आहे.


गेल्या महिन्यात आंबी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र नार्हेडा अजून पोलिसांना मिळाला नसून तातडीने अटक करावी व पोलीस दलातून निलंबित करावे या मागणीसाठी सदर पीडित महिलेने उद्या १५ ऑगस्ट रोजी गृहमंत्री फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत