राहुरी(वेबटीम):- राहुरी येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या मयत कर्जदाराच्या कुटुंबास ३ लाख रुपयांचा अपघात वि...
राहुरी(वेबटीम):-
राहुरी येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या मयत कर्जदाराच्या कुटुंबास ३ लाख रुपयांचा अपघात विमा पॉलिसी प्रदान करण्यात आली आहे.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहुरी या संस्थेचे कर्जदारदादा महेबूब पठाण याचे अपघाती निधन झाले होते .संस्थेने त्यांच्या नावाने रू ३ लाखांची युनायटेड इन्शुरंन्स कंपनीची अपघाती विमा पॉलिसी घेतली होती. सदर पाॅलीशी मंजूर झाली.त्यांचे कर्जाची संपूर्ण रक्कम जमा करून उर्वरित रक्कमेचा चेक त्यांच्या वारसदार रज्जाक पठाण यांना देण्यात आला.
चेअरमन जनार्दन किसन निमसे ,व्हा.चेअरमन गणेश अशोक शेजूळ ,मॅनजर के.के शिंदे,विमा प्रतिनिधी रविराज म्हसे व सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी वृंद व दैनिक ठेव प्रतिनिधी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत