देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी संस्थेचा उद्या शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी सक...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी संस्थेचा उद्या शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वर्धापनदिन सोहळा देवळाली प्रवरा बाजारतळ येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन गणेश दादा भांड यांनी दिली.
देवळाली प्रवरा परिसरातील शेतमजूर, कष्टकरी, छोट मोठे व्यावसायिक यांना आर्थिक आधार देण्यासाठी गेल्या ५ वर्षापूर्वी गणेश दादा भांड यांनी कानिफनाथ निधी संस्थेची स्थापना केली. ग्राहक, ठेवीदार व सर्वसामान्य खातेदार यांचा विश्वास संपादन करून कानिफनाथ निधी संस्था ६ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले असून शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता देवळाली बाजारतळ येथे वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन गणेश भांड, सर्व संचालक मंडळ तसेच अधिकारी-कर्मचारी वृंद व पिग्मी एजंट आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत