देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील गणपती चौक, कदम वस्ती चारी नंबर ४ येथील कदम पाटील परिवाराच्यावतीने बैलपोळ्य...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील गणपती चौक, कदम वस्ती चारी नंबर ४ येथील कदम पाटील परिवाराच्यावतीने बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीनं राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून आपल्या सर्जाराजाचा पोळा हा सण शेतकरी बांधव श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. त्यानुसार कदम पाटील परिवाराच्यावतीने डीजेच्या निनादात बैल जोड्यांची मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक कदम यांच्या पुढाकाराने हा बैलपोळा सण साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत