राहुरी(वेबटीम) भीम आर्मीच्या जिल्हा संघटकपदी सिकंदर इनामदार यांची नियुक्ती केल्याचे पत्र नुकतेच जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी दिले. बारा...
राहुरी(वेबटीम)
भीम आर्मीच्या जिल्हा संघटकपदी सिकंदर इनामदार यांची नियुक्ती केल्याचे पत्र नुकतेच जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी दिले. बारागाव नांदूर ग्रामस्थांतर्फे इनामदार यांचा सन्मान करण्यात आला.
बहुजन हिताय-बहुजन सुखाय हे ब्रिद घेऊन समाजामध्ये समाजहिताला प्राधान्य देणार्या भीम आर्मी संघटनेच्या हितासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये भीम आर्मी संघटना कार्यरत असल्याचे बिवाल यांनी सांगितले. बारागाव नांदूर इनामदार यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांची जिल्हा संघटक पदावर नियुक्ती केल्याची माहिती दिली. इनामदार यांनी निवडीनंतर राज्य व जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकर्यांचे आभार व्यक्त करीत भीम आर्मीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. निवडीनंतर बारागाव नांदूर येथील राहुल आंधळे, अहमद देशमुख, रज्जाक देशमुख, राजू देशमुख, यासिन इनामदार, शौकत इनामदार, रिजवान देशमुख, नवाज इनामदार यांसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत