राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- पतसंस्था चळवळ हि ग्रामीण अर्थव्यवस्थेस बळकटी देण्याचे काम करत असून पतसंस्था चालविताना ग्राहक व ठेवीदारांचा विश्व...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
पतसंस्था चळवळ हि ग्रामीण अर्थव्यवस्थेस बळकटी देण्याचे काम करत असून पतसंस्था चालविताना ग्राहक व ठेवीदारांचा विश्वास महत्त्वाचा असतो.तोच विश्वास संकल्प पतसंस्था जोपासून सर्व सामान्यांना आधार देण्याचे निश्चितच काम करेल असा विश्वास सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मुरलीधर पाटील कदम होते.
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवर नव्याने सुरू झालेल्या संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाले.प्रसंगी महंत रामगिरी महाराज बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उद्योजक बाबासाहेब चिडे, बाळासाहेब बकाल, संकल्प पतसंस्थेचे मार्गदर्शक व संचालक अण्णासाहेब चोथे, मधु महाराज, ज्योती दिदी , सुखदेव मुसमाडे, तनपुरे कारखान्याचे संचालक मच्छीन्द्र तांबे, अशोक खुरुद, विजय डौले आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्तविकात संस्थेचे आद्यप्रवर्तक तथा चेअरमन प्रा.सुधाकर कदम यांनी संस्था स्थापनेचा उद्देश विषद करून छोट-मोठ्या व्यावसायिकांना अर्थाधार देण्यासाठी संस्था सुरू केली असल्याचे सांगून संस्थेच्या सुविधेविषयी माहिती दिली.
यावेळी बाबासाहेब चिडे , मुरलीधर कदम यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, देवळाली सोसायटीचे चेअरमन संतोष चव्हाण, माजी चेअरमन सोपानराव शेटे, सोपानराव भांड, शहाजी कदम, माजी उपनगराध्यक्ष अशोक शेटे, आप्पासाहेब कोहकडे, माजी नगरसेवक सचिन ढुस, बाळासाहेब खुरुद, अमोल कदम, आदीनाथ कराळे, माऊली वाणी, सौ. उर्मिला शेटे, सौ.सुनीता थोरात अजित चव्हाण, डॉ.संदीप मुसमाडे, संजय बर्डे, अनंत कदम, शैलेंद्र कदम, चैतन्य मिल्कचे चेअरमन गणेश भांड, राहुरी निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे,संख्येश्वर पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र सोळंकी, नगर अर्बन बँकेचे संचालक अनिल कोठारी, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शिवसेना तालुकाप्रमुख सुनील कराळे, मेजर राजेंद्र कडू, अध्यात्मिक आघाडी जिल्हाप्रमुख संपत महाराज जाधव, मारुती खरात, टाकळीमियाचे उपसरपंच किशोर मोरे, प्रा.बाबासाहेब चव्हाण, डॉ. सुवर्णा गोलेचा, भाऊसाहेब वाळुंज, उद्योजक ऋषभ लोढा, संदीप कदम, योगगुरू किशोर थोरात, बबनराव वाकचौरे, प्रा.विलास मुसमाडे, राहुरीचे माजी नगरसेवक शहाजी ठाकूर, किशोर जाधव, मारुती हारदे, ज्ञानदेव हारदे, मेजर प्रभाकर महांकाळ, मेजर शरद चव्हाण, रवींद्र राऊत, दत्तात्रय दरंदले, डॉ.रवींद्र वामन, डॉ.सूरज महाडिक, डॉ.अनंत कुमार शेकोकार, डॉ.भागवत वीर, डॉ.सुनील वसंत कदम, डॉ.प्रणित बोरा, डॉ.अखिलेश राऊत, डॉ.सुनील नारायण कदम , राजेंद्र छाजेड, रवीनकुमार छाजेड, दत्तात्रय गागरे, राजेंद्र चव्हाण, कांता कदम, भाऊसाहेब गुंजाळ आदिंसह देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात नागरिक माता-भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ५ ठेवीदारांचा व संस्थेच्या संचालकांचा महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमा यशस्वीतेसाठी संस्थेचे संचालक डॉ.शौकत सय्यद, विजयकुमार खळेकर, विठ्ठल शेटे, मुकुंद वेदपाठक, पारसमल खिंवसरा, बबन डोंगरे, संदीप माने, भारत शेटे, सुजाता कदम, स्वाती काळे तसेच विनोद चोथे, सोमा हारदे, श्री.खाटेकर आदींनी परिश्रम घेतले.आभार संस्थेचे व्हा.चेअरमन भालचंद्र थोरात यांनी मानले.
माजी आ.कदम व कर्डीलेंकडून सदिच्छा भेट
संकल्प पतसंस्था उद्घाटन समारंभानिमित्त माजी आ.तथा शिर्डी संस्थांनचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम तसेच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी भाजप माजी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, मारुती नालकर आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत