अहमदनगर(वेबटीम) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील दलित कुटुंबातील अमानुष मारहाण प्रकरणातील नानासाहेब गलांडे यास तातडीने अटक करावी अशी म...
अहमदनगर(वेबटीम)
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील दलित कुटुंबातील अमानुष मारहाण प्रकरणातील नानासाहेब गलांडे यास तातडीने अटक करावी अशी मागणी अन्यथा २० सप्टेंबर पासून अहमदनगर एसपी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्यासह पीडित तरुणांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या महिन्यात हरेगाव येथील दलित कुटुंबातील मुलांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करत अंगावर लघुशंका केल्याची घटना घडली. या घटनेचा राज्यातील दलित नेत्यांसह विविध स्तरातून निषेध करण्यात आला.
दलित कुटूंबातील तरुणांना अमानुष मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नानासाहेब गलांडे अद्याप फरार असून त्याला पोलिसांनी तातडीने अटक करावी अन्यथा २० सप्टेंबर पासून पीडित तरुणांना सोबत घेऊन अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे.
हरेगाव घटनेतील पिडित युवक शुभम माघाडे,कुणाल मगर, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे, कुमार भिंगारे आदिंसह आरपीयायचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत