राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कणगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बाळासाहेब गाढे यांची निवड करण्यात आली. कणगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपद...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कणगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बाळासाहेब गाढे यांची निवड करण्यात आली.
कणगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाचा जुबेदाबी महमदभाई इनामदार यांनी राजीनामा दिल्याने आज ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी बैठक झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव घाडगे होते.उपसरपंच पदासाठी अर्ज करण्याची मुदत सकाळी दहा मिनिटे वेळ होती. मुदतीत बाळासाहेब गाढे यांचा एकमेव अर्ज आल्याने अर्जाच्या छाननी नंतर अध्यक्ष सर्जेराव घाडगे यांनी बाळासाहेब गाढे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गाढे, आश्विनी संदीप घाडगे, नंदाकिनी भगवान घाडगे, जुबेदबी महमदभाई इनामदार, छायाताई गाढे, भाऊसाहेब आड भाई, मनीषा राजेद्रा दिवे, सीमाताई गोरक्षनाथ घाडगे धनंजय बर्डे, रामदास दिवे, अर्चना रंगनाथ घाडगे ई ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी संभाजीराव निमसे उपस्थित होते
या निवडीबद्दल उपसरपंच बाळासाहेब गाढे यांचे ना.राधाकृष्ण विखे, खा. सुजय विखे , माजी आ. शिवाजीराव कर्डिले , सुभाष पाटील, रावसाहेब तनपुरे, राजेंद्र साबळे, दत्तात्रय गाढे, बाबुराव घाडगे, भाऊसाहेब नाल कर, गोरक्षनाथ गाढे, डॉ. रघुनाथ नालकर , आण्णासाहेब घाडगे , बाबुराव निमसे, संदीप घाडगे, दादासाहेब घाडगे, विजय गोरे आदिंसह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत