राहुरी(प्रतिनिधी) राहुरी शहरातील नगर-मनमाड मार्गलगत असलेल्या मोटवानी वाईन्सच्या दुकानात मद्यपान करून आलेल्या अनोळखी इसमाने बीयर घेण्यासाठी...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी शहरातील नगर-मनमाड मार्गलगत असलेल्या मोटवानी वाईन्सच्या दुकानात मद्यपान करून आलेल्या अनोळखी इसमाने बीयर घेण्यासाठी दिलेली ५०० रुपयांची नोट खराब असल्याचे वाईन्स शॉपी चालकाने म्हंटल्याने सदर अनोळखी इसमाने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जसविंदरसिंग कथुरीया यांच्या मालकीच्या राहुरीतील नगर-मनमाड मार्गावरील मोटवानी वाईन्स येथे शनिवारी सायंकाळी एक अनोळखी इसम दारूच्या नशेत आला. त्याने बीयरची बाटली घेण्यासाठी ५०० रुपयांची नोट दिली.त्यावर जसविंदरसिंग कथुरीया यांनी सदर नोट खराब आहे, दुसरी द्या असे म्हणताच अनोळखी मद्यधुंद इसमाने जसविंदरसिंग कथुरीया यांना अरेरावी, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत जसविंदरसिंग कथुरिया यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत