शिर्डी(वेबटीम) राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करणारे संगमनेर तालुक्यातील दोन आरोपी अहमदनगर एलसीबीने नाशिक ...
शिर्डी(वेबटीम)
राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करणारे संगमनेर तालुक्यातील दोन आरोपी अहमदनगर एलसीबीने नाशिक रोड पोलिसांच्यामदतीने अवघ्या काही तासात जेरबंद केले आहेत.
शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 20/09/2023 रोजी रात्री 22/00 वाजताच्या सुमारास सावळी विहीर ता. राहता झालेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये चार व्यक्ती मयत व इतर व्यक्ती जखमी असून सदरचे कृत्य करणारे आरोपी नामे सुरेश विलास निकम((वय 32 वर्ष) आणि रोशन कैलास निकम दोघे राहणार संगमनेर खुर्द तालुका संगमनेर हे नाशिकच्या दिशेने येत असल्याची माहिती PSI तुषार धाकराव एलसीबी अहमदनगर यांनी नाशिक रोड पोलिसांना कळविल्याने 21/09/2023 रोजी 03/32 वाजता नाशिक रोडचे API गणेश शेळके, PSI रामदास विंचू आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील स्टाफसह नाशिक पुणे हायवेवर शिंदे गाव टोल नाका या ठिकाणी सापळा रचून वरील नमूद आरोपींना पल्सर मोटारसायकलसह शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी आणि स्टाफने केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत