राहुरीत इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेस प्रतिसाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेस प्रतिसाद

  राहुरी(वेबटीम)           लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय राहुरी या ठिकाणी राहुरी तालुका कलाध्यापक संघटनेच्या वत...

 राहुरी(वेबटीम)



          लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय राहुरी या ठिकाणी राहुरी तालुका कलाध्यापक संघटनेच्या वतीने इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा एक दिवस ची आयोजित करण्यात आली होती.



 या कार्यक्रमाचे उद्घाटन अहमदनगर शिक्षक सोसायटीचे संचालक व संत महिपती महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नंदकुमार दिघे मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष श्री सर्जेराव पेरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रा .श्री संदिप मगर,राज्य कलाध्यापक संघाचे पुणे विभागीय उपाध्यक्ष अशोक काळे,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाचरणे,बाळासाहेब तांबे,शिक्षक सोसायटीचे संचालक नंदकुमार दिघे उपस्थित होते,शिल्पकार श्री किशोर भगत यांनी प्रात्यक्षिक दाखवून कार्यशाळेला सुरुवात केली यामध्ये राहुरी तालुक्यातील विविध विद्यालयातून 270 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता उत्कृष्ट कलाकृती व गणेश मूर्ती तयार करणाऱ्या विद्यार्थ्याला पारितोषिक, सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .

     या कार्यशाळेत पर्यावरणाचे रक्षण व मुला मधील सुप्त गुणांना वाव देणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश कलाध्यापक संघटनेचा होता . या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे माझ्या पप्पांनी गणपती आणला या गीताने विद्यार्थी आनंदात गणपती बनवीत होते .

    या कार्यक्रम प्रसंगी कलाध्यापक संघटनेतील पदाधिकारी  प्रशांत सूर्यवंशी  बाळासाहेब पाचरणे  विशाल तागड ,सुनील भुजाडी, मच्छिंद्र देशमुख ,दत्तात्रय साळवे, बाळासाहेब पिले,बी. एल . शिरसाठ , भाऊसाहेब पगारे तांबोळी,अभय पाटील,पत्रकार गणेश विघे, हरीश साळवे, नवनाथ खरात,प्रा,महेश शेळके ,संतोष बर्डे ,राजश्री वारुळे , सविता खळेकर ,आदींसह तालुक्यातील शिक्षक उपस्थितीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत