राहुरी(वेबटीम) राहुरी,नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील तसेच राहुरी तालुक्यातील १८ वर्षाखालील बालकांसाठी हृदयरोग व इतर व्याधीने त्रस्त असलेल...
राहुरी(वेबटीम)
राहुरी,नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील तसेच राहुरी तालुक्यातील १८ वर्षाखालील बालकांसाठी हृदयरोग व इतर व्याधीने त्रस्त असलेल्या रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दि २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी केले आहे.
याबाबत आमदार प्राजक्त तनपुरे माहिती देताना म्हणाले की या शिबिरातील पुढील व्याधींची तपासणी मोफत करण्यात येणार आहे. रुग्ण तपासणीसाठी तज्ञ डॉ.चिंतन व्यास, डॉ. योगेंद्र शेखावत, व डॉ. प्रिया प्रधान आदि उपस्थित राहणार आहे १) हृदयरोग - हृदयाला छिद्र, हृदयाला सूज, हृदयाच्या झडपेचे आजार, हार्ट फेलर. २) अस्थीरोग - पाय / घोटा / गुडघा / हिप / मणका विकृती, हाड व सॉफ्ट,टिशू ट्यूमर, फ्रॅक्चर व डिस्लोकेशन, स्पोर्ट इंज्युरी, स्पाईना बिफिडा, मानेत सुज, मांडीचा सांधा ३) सर्जरी - फाटलेले ओठ, दुभंगलेले टाळू, लघवी करताना येणारी अडचण, अंडाकोषात सूज
४) बोन मॅरो ट्रान्सप्लांट - थैलेसीमिया
शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबिर शस्त्रक्रियेसाठी सर्व बालकांची राहुरी येथील शिबिरात तपासणी केली जाईल.
शिबीर शनिवार, दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०९.०० ते दु. ३.०० वाजेपर्यत ठिकाण - स्नेहपुंज लॉन्स, नगर-मनमाड रोड, राहुरी, जि. अहमदनगर येथे होणार असून,शस्त्रक्रिया,शिबीरातील रुग्णावर SRCC हॉस्पिटल,मुंबई येथे मोफत उपचार करण्यात येतील.शिबिरातील नांव नोंदणी संपर्का साठी खालील नंबरवर संपर्क करावा १)शुभम थोरात 9130 275310,२)शरद तनपुरे 9423085171 ३) अमोल गुलदगड 73855 21310 ह्यांचेशी संपर्क करावा.
या शिबिराचा राहुरी तालुक्यातील तसेच राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील रुग्णांनी व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत